बेळगाव :
उद्यमबाग येथील नागशांती, हय़ुंडाई शोरूममध्ये ‘ऑरा’ या नव्या कारचा विक्री शुभारंभ नुकताच झाला. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. शेख शिक्षण समूहाचे चेअरमन अबू शेख, संचालिका डॉ. सबिना, ऍड. बेंबळगी आदींसह निमंत्रित मान्यवरांनी ऑरा कारच्या कव्हरचे अनावरण केले. तसेच कंपनी आणि शोरूम संचालकांना शुभेच्छा दिल्या.
‘ऑरा’ ही नवीन कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिन्ही मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. बीएस-6 या आधुनिक प्रणालीचा वापर करून कारची निर्मिती केली आहे. सहा रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे. पाच वर्षांची ‘वंडर वॉरंटी’ देणारी ही भारतामधील पहिली कार आहे. अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण अशी ही कार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी नागशांती हय़ुंडाईचे जनरल मॅनेजर सतीश प्रभू, सेल्स मॅनेजर गिरीश भुजण्णवर, शोरूम व्यवस्थापक अभिजीत पवार, रुरल मॅनेजर अली नालबंद आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.









