प्रतिनिधी / सातारा :
किकबॉक्सिंग असोसिएशन, पुणे यांचेवतीने राज्यस्तरीय फेडरेशन कप – 2020 निवड स्पर्धेत शाहूपुरी येथील निशांत राजेंद्र केंडे याने सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धा 10 ते 12 जानेवारी दरम्यान मावळ, पुणे येथे पार पडल्या.
शाहूपुरी येथील सर्व सामाजिक क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या निशांत राजेंद्र केंडे यांने मावळ, पुणे येथे झालेल्या किकबॉक्सिंग असोसिएशन, पुणे यांचेवतीने राज्यस्तरीय फेडरेशन कप – 2020 अंतर्गत घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत 51 किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. निशांतच्या या सुवर्णपदक प्राप्तीमुळे त्याची नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱया किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून त्याच्या या निवडीमुळे शाहूपुरीसह सातारा जिह्याचे नाव देशपातळीवर उंचावले गेले असल्याची भावना शाहूपुरीवासियाची व्यक्त केली आहे.
शाहूपुरीतील युवाशक्तीने आजपर्यंत कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांत शाहूपुरीचे नांव नेहमीच उंचाविण्याचा प्रयत्न केला असून त्यांचा शाहूपुरी ग्रामस्थांना अभिमान आहे.









