हरारे / वृत्तसंस्था
अँजिलो मॅथ्यूजने 468 चेंडूत 16 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 200 धावा फटकावल्यानंतर श्रीलंकेने यजमान झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱया दिवसअखेर 127 धावांची आघाडी नोंदवली. झिम्बाब्वेचा पहिला डाव 358 धावांवर पूर्ण झाल्यानंतर लंकेने मॅथ्यूजच्या द्विशतकानंतर 9 बाद 515 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर झिम्बाब्वेने दिवसअखेर 17 षटकात बिनबाद 30 धावा जमवल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे पहिला डाव : 358. श्रीलंका पहिला डाव : 9 बाद 515 वर घोषित (अँजिलो मॅथ्यूज 468 चेंडूत 16 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 200, कुशल मेंडिस 163 चेंडूत 8 चौकारांसह 80. अवांतर 11. व्हिक्टर न्यायूची, सिंकदर रझा प्रत्येकी 3 बळी). झिम्बाब्वे दुसरा डाव : 17 षटकात बिनबाद 30.









