ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिलीय.
ते म्हणाले, आधी घोषणा केल्या प्रमाणे उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील.
याचबरोबर, प्रभू श्रीरामाची कृपेने महाविकास आघाडीचे सरकार जोरात कामास लागले आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधीही ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा अयोध्येला येईन. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते अयोध्येत जावून रामललाचं दर्शन घेणार आहे.