ऑनलाईन टीम / मुंबई :
‘नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ’ असल्याचे सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
दरम्यान, मुंबईतील नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता येत्या 27 जानेवारीपासून मुंबईत नाइटलाइफ प्रत्यक्षात लागू होणार आहे. या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे.
शेलार म्हणाले, ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे. या नाइटलाइफच्या माध्यमातून मोठय़ा भ्रष्टाचाराला सुरुवात होईल. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱयांना माहिती नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.