ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘तान्हाजीः द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटावरून एक नवा वाद सुरु झाला आहे. तान्हाजी चित्रपटातून चूकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे, असा आरोप तानाजी मालुसरेंच्या गावकऱयांनी केला आहे.
त्यांच्या मते तान्हाजी चित्रपटात चूकीचा इतिहास मांडला आहे. या चित्रपटात तान्हाजीचे जन्मगाव गोडवलीचा उल्लेख नसल्यामुळे गावकरी नाराज आहेत. चित्रपटाची निर्मिती करताना आम्हाला गावाच्या उल्लेखाविषयी शब्द दिला होता. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यात कुठेही हा उल्लेख नाही, असे गावकरी म्हणाले.
याविषयी गोडवली ग्रामस्थांनी निर्माते-दिग्दर्शकांना पत्र लिहिले असून त्यावर सकारात्मक उत्तर न आल्यास आंदोलन करू असा इशारा गावकऱयांनी दिला आहे.









