वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूरमधील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी थावोऱत सिस्टिम्स प्रा.लि, केरळ यांचेमध्ये संगणक क्षेत्रातील नव नवीन तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीचा सामंजस्य करार झाला.
करारामुळे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागात शिकत असणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रकल्प (प्रोजेक्ट ) करणेसाठी लागणारे आवश्यक असे मार्गदर्शन, आद्योगिक प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी ग्वाही कंपनीचे कार्यकारी संचालक निधिशीदास थावोऱत यांनी दिली.
या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी हि संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या करारासाठी समन्वयक डॉ. जी. व्ही. पाटील यांनी परिश्रम घेतले व त्यांना विभागप्रमुख प्रा. ए. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी , डॉ. वासंती रासम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.