तालुका पंचायतसमोर ठिय्या, कामे न दिल्याने संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासू उद्योग खात्रीतील कामांना तालुक्मयात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र आंबेवाडी ग्राम पंचायतमधील रोजगारांना कामे देण्यात आली नाहीत. याचा भडका सोमवारी उडाला. तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडून कामे देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंबेवाडी आणि मण्णूर गावातील रोजगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
मण्णूर गावात मागील अनेक वर्षांपासून उद्योग खात्रीचे कामे देण्यात येत नाहीत. वारंवार ग्राम पंचायतीकडे मागणी करण्यात आली. मात्र याची दखल घेण्यात नाली नाही. ग्राम पंचायतीचे पिडीओ गंगाधर यांनी रोजगारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्हाला काम द्या अन्यथा आपण हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी उद्योग खात्रीतील रोजगारांनी घेतला.
उद्योग खात्रीतून यावषी ग्राम पंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात कामे शिल्लक आहेत. मात्र पिडीओ आणि संबंधित अधिकाऱयांनी येथील रोजगारांना बाहेर गावी कामे देण्याचे सांगितले. यावषी आलेल्या महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा आराखडा तयार करुन ती कामे येथील रोजगारांना कामे देण्याची गरज होती. मात्र ग्राम पंचायत पिडीओ व अधिकाऱयांनी झोपेचे सोंग घेतल्याने अनेकांच्या घरामध्ये चुल पेटणेही कठीण बनले आहे. तेंव्हा तातडीने कामे द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कामे न दिल्याने अनेकांतून यावेळी संताप व्यक्त करण्यात येत होते. यावेळी उद्योग खात्री आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आम्हाला काम दिलेच पाहिजे यासह इतर घोषणाही रोजगारांनी दिल्या. यावेळी शिवाजी कागणीकर, एल. व्ही. होनगेकर, यशोधा गोविंदाचे, आर. बी. पाटील, एल. एस. कदम, मालू पी. एस., गीता जाणाई, जी. एम. सांबरेकर, यु. एम. चौगुले, रेणूका डोणकरी, मालू मंडोळकर यांच्यासह इतर रोजगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









