वृत्तसंस्था/ बार्सिलोना
रविवारी येथे झालेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोनाने ग्रेनेडावर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात एकमेव गोल 76 व्या मिनिटाला कर्णधार मेसीने केला.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोना संघ 20 सामन्यांतून 43 गुणांसह सरस गोल सरासरीच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. रियल माद्रीद 43 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. बार्सिलोना संघाला नवे प्रशिक्षक सेटीन यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतील बार्सिलोनाचा हा पहिला विजय आहे.









