19 ते 25 जानेवारी 2020
मेष
मकर राशीत 24 जानेवारी रोजी शनि महाराज प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सोमवार, मंगळवार धावपळ होईल. प्रवासात काळजी घ्या. नोकरीत मोठी चांगली संधी मिळेल. धंद्यात वाढ करता येईल. शेतकऱयाचा नवा निर्णय फायदेशीर ठरेल. मेहनत करा. लाभही वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकसंग्रह वाढवा. घरगुती कामे होतील. घर, वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण कराल.
वृषभ
24 जानेवारी रोजी मकर राशीत शनि प्रवेश करीत आहे. तुमच्या कामातील अडचणी त्यामुळे कमी होतील. चंद्र, बुध लाभयोग होत आहे. हा सप्ताह थोडा तणावाचा, धावपळीचा वाटेल. धंद्यात वाढ करता येईल. घरात वाद वाढवू नका. नोकरीतील गैरसमज दूर करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात उत्साह राहील. तणाव दूर होईल. शेतकरी वर्गाला नवा पर्याय शोधता येईल. कुठेही उतावळेपणा नको. विचारपूर्वक वागा.
मिथुन
24 जानेवारी मकरेत शनि प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. या सप्ताहात अडचणी पार करून यश मिळवायचे आहे. रागावर ताबा ठेवा. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येण्याची शक्मयता आहे. व्यवहारात नम्रपणा ठेवा. गुप्तगोष्टी उघड होण्याचा संभव आहे. संसारात पोषक वातावरण राहील. शेतकरी वर्गाला अस्थिर वाटेल.
कर्क
मकर राशीत शनि महाराज प्रवेश करीत आहेत. सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. हळूहळू काही समस्या कमी होण्यास सुरुवात होईल. धंद्यात टिकून रहा. नवे काम मिळेल. नोकरीत मर्जी राखता येईल. घरगुती कामे वाढतील. जवळच्या व्यक्तीची काळजी कराल. स्वत:च्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. व्यसनात बुडू नका. नवीन ओळख झाल्यावर एकदम व्यवहार करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात कार्य करत रहा.
सिंह
मकर राशीत शनि प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. अनुभवी लोक तुमच्या कार्यावर आक्षेप घेतील. टिका होईल. त्यामुळे राजकीय, सामाजिक कार्यात हल्लाबोल होईल, असे भडक वक्तव्य टाळा. धंद्यात समस्या येईल. नम्रपणे बोला. नोकरीत वरि÷ांचा विचार घ्या. वसूली करता येईल. शेतकरी वर्गाला तात्पुरत्या अडचणी येतील. कोर्टकेस सोपी नाही. घरगुती कामे होतील. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. शांत रहा.
कन्या
मकर राशीत शनि प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. तुमचा कामाचा उत्साह असला तरी अडचणी येतील. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. तुम्ही व्यसनात वेळ घालवू नका. धंद्यात सुधारणा होईल. नोकरीत वरि÷ खूष होतील, असे काम कराल. कायदा मोडू नका. एकदम मोठा विश्वास कुणावरही टाकू नका. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी वाढू शकते. कुणालाही दुखवू नका. स्पर्धा जिंकता येईल. केसमध्ये प्रगती होईल.
तूळ
24 जाने. रोजी मकर राशीत शनि प्रवेश, चंद्र-गुरु युती होत आहे. या सप्ताहात तुम्ही महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात तडजोड करावी लागेल. मोठे काम मिळवता येईल. कायद्याचे पालन सर्व ठिकाणी करा. नोकरीत वरि÷ तुमच्याकडे कठीण काम देण्याची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टिका होऊ शकते. लोकप्रियता मिळेल. घरात महत्त्वाचा प्रश्न सोडवा. स्पर्धा जिंकाल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. शेतकरी वर्गाला जुने अनुभव उपयोगी पडतील.
वृश्चिक
मकर राशीत शनि प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. 24 जानेवारी रोजी वृश्चिक राशीची साडेसाती संपणार आहे. धंद्यात वाढ करता येईल. नोकर मिळतील. नवीन ओळखी वाढतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करा. लोकांची नाराजी होऊ शकते. स्वत:च्या घरगुती समस्या सोडवा. घर, वाहन घेता-विकता येईल. कला, क्रीडा स्पर्धा जिंकाल. केस संपवता येईल.
धनु
मकर राशीत शनि प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. धनुराशीची 5 वर्षे साडेसातीची पूर्ण झाली झाली आहेत. या वर्षात तुम्हाला राहून गेलेली सर्व कामे मार्गी लावता येईल. शेतकरी वर्गाची प्रगती होईल. लाभ मिळेल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत कायद्याचे पालन करून सोमवार,मंगळवार निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जाता येईल. लोकप्रियता मिळेल. विवाह जमवता येईल. स्पर्धा जिंकाल. वाहन जपून चालवा.
मकर
तुमच्याच राशीत शनि महाराज प्रवेश करीत आहेत. चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. थकबाकी वसूल करा. नोकरीत कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या हितासाठी कामे करा. अरेरावी नको. लोकप्रियता मिळवा. घरगुती चिंता कमी होईल. कला, क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. कोर्टाच्या कामात योग्य मार्गदर्शन घ्या. शेतकरी वर्गाने विचारपूर्वक वागावे, कष्ट घ्यावे लागतील.
कुंभ
मकर राशीत शनि प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. कुंभ राशीला साडेसाती 24 जानेवारीला सुरू होत आहे. या सप्ताहात तुमचा उत्साह राहील. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात लक्ष ठेवा. नोकरीत वरि÷ांचा दबाव राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर जबाबदारी टाकली जाईल. कोर्टाच्या कामात सावध रहा. यश मिळवता येईल. कला, क्रीडा स्पर्धेत ओळखी होतील. घरातील कामे करून घ्या.
मीन
मकर राशीत शनि प्रवेश 24 जानेवारीला होत आहे. रविवारी किरकोळ तणाव, नाराजी होईल. धंद्यात लाभदायक घटना घडेल. कुणालाही दुखवू नका. नोकरीत प्रगती होईल. बदली मनाप्रमाणे करून घेता येईल. परदेशात जाल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला पदाधिकार मिळेल. लोकांच्यासाठी कामे करा. स्थान बळकट करा. कोर्टकेस जिंकाल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. घर, वाहन खरेदी करता येईल.





