वृत्तसंस्था / मुंबई :
भारतीय उद्योगक्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या गरवारे क्लब हाऊसतर्फे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना मानद सदस्यत्व देऊन गौरविण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये कोहली आणि गांगुली यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या कामगिरीचा गौरव गरवारे क्लब हाऊसतर्फे करण्यात आला आहे. गरवारे क्लब हाऊसचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि भाजपानेते राज पुरोहित यांच्या उपस्थितीत गेल्या बुधवारी येथील वानखेडे स्टेडियमवर एका समारंभात ही घोषणा करण्यात आली.









