प्रतिनिधी/ पणजी
कला अकादमी गोवा, पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा आयोजित वार्षिक राष्ट्रीय लोकमहोत्सव ‘लोकोत्सव 2020’मध्ये गोमंतकीय कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. आज एकूण 5 गोमंतकीय संघांनी गोमंतकीय लोककलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. कला अकादमी येथील दर्यासंगमावर आयोजित लोकोत्सवात राजस्थानी लोककला ‘बहुरुपीया’ प्रेक्षकांना अनुभवायला †िमळत आहे.
बुधवारी कमलावती रवळनाथ कला मंडळ करमळी, दयानंद कला केंद्र कुडचडे, श्री महामाया आरती मंडळ शिरोडा, सेंट सिबेस्तीन महीला मंडळ सांस्कृतिक ट्रूप केपे आणि नवदुर्गा कला दर्शन कुंडई यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. प्रसंगी प्रेक्षकांनी कलेची वाहवा केली असून कलाकारांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वादीही दिले
लोकोत्सवात सायं. 4 वाजल्या नंतर ‘बहुरुपीया’ लोकात्सवाला भेट देणाऱयांचे मनोरजन करतात. ही राजस्थानची कला जयपुर येथील मयुर आणि विक्रम राजभाट यांनी जपली असून गोव्यात ते दोन वर्षे महोत्सवाला येत आहेत. गुधवारी मयुर यांनी टीपू सुल्तनाची वेशभूषा केली होती तर त्यांचे वडील विक्रम यांनी क्रूडसिंग यांची वेशभूषा केली होती.
मयुर यांनी सांगितले की ही कला आम्ही वडीलोंपार्जीत जपली आहे. केवळ उपस्थितांचे मनोरंजन करणे हेच आमचे काम आहे. आम्ही गोमंतकीयांचे मनोरंजन करण्यासाठी इथे आलो असून गोमंतकीयांना आमचा चांगल्या पद्धतीने स्वीकार केला आहे.









