मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विद्यालयांना आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
एखादी गोष्ट सांगण्यासाठी चित्रपट हे योग्य माध्यम आहे. मुलांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा हा योग्य मार्ग आहे. भारतात विज्ञान चित्रपट माध्यमाचा विस्तार हवा तेवढा न झाल्याने मुलांना प्रात्यक्षिक दाखविणेही महत्वाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी समुद्रकिनारी जाण्याची आवड असते परंतु विद्यालयाने विद्यार्थ्यांना गोव्यातील विविध संशोधन केंद्रात सहल न्यावी. असे झाल्यास गोव्यातून अनेक वैज्ञानिक निर्माण होतील असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
विज्ञान परिषद आयोजित भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी सत्यजित रे फ्ढिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुटच्या संचालिका डॉ. देबमित्रा मित्रा, आयआरएस-इस्रो केंद्र देहराधूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फ्ढळदेसाई, धेंपो ग्रुप ऑफ्ढ इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, विज्ञान भारती राष्ट्रीय आयोजन समितीचे सचिव जयंत सहस्त्रबुद्धे आणि विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे यांची उपस्थिती होती. दि. 18 जानेवारपर्यंत महोत्सव गोवा मनोरंजन संस्था मॅकनिज सभागृह येथे होणार आहे.
डॉ. प्रकाश चौहान यांनी सांगितले की, विद्यार्थी गणित आणि विज्ञान हे दोन कठीण विषय म्हणून पाहतात. परंतु हे विषय आपल्या जीवनाशी संबंधित आहे हे जाणले पाहीजे. पाऊलापाऊलांवर आपला विज्ञानाशी संबंध येतो. त्यामुळे जे विद्यार्थी या विज्ञानापासून आणि गणितापासून दूर पळतात त्यांना जवळ आणण्याची आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
अध्यक्ष सुहास गोडसे यांनी स्वागत केले व ते म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने महोत्सवाचे आयोजन केले आहे. विज्ञान हा केवळ महत्वाचा विषय नाही तर एक मनोरंजक क्षेत्रसुद्धा आहे. संशोधन, विकास आणि शोध यासारख्या बाबी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आणि विविध उपक्रमांतून अत्यंत चांगल्या पद्धतीने उलगडत जातात.
डॉ. देबमित्रा मित्रा यांनी महोत्सवाचा आपणही एम भाग असल्याने समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, विज्ञानाच्या प्रचारासाठी विज्ञानावर आधारित चित्रपट प्रभावी आहेत. हे चित्रपट मोठय़ा प्रमाणात लोकांना विज्ञानाबाबत माहिती देतात.
या महोत्सवासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग, विज्ञान प्रसार, गोवा मनोरंजन संस्था, नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ्ढ ओशनोग्राफ्ढाr, गोवा विद्यापीठ, सत्यजित रे फ्ढिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुट आणि नॅशनल इन्स्टिटय़ुटनॉफ्ढ सायन्स कम्युनिकेशन ऍण्ड इन्फ्ढाsर्मेशन रिसोअर्सने सहकार्य केले आहे.
तीन दिवसीस मास्टरक्लासचे आयोजनही करण्यात आले आहे. दि. 16 रोजी दुपारी 12.15 ते 1.30 वाजेपर्यंतचा मास्टरक्लास थिओडॉन टेक्नॉलॉजीज येथील राजदीप पॉल घेतली. दि. 17 रोजी सकट शेकर रे हे दु. 12 ते 1.30 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 ते सायं. 6 वाजेपर्यंत एसआरटीएफ्ढआयचे प्रतिनिधित्व करणारे अमरेश चक्रवर्ती यांच्यासह दोघे एटीएलॅब्सच्या इनोव्हेशन्स आणि एंटरप्रेन्युअरशिप या विषयावरील सेशन घेणार आहेत. दि. 18 रोजी ‘सोसायटीच्या दीशेने विज्ञान संप्रेषणातील आव्हाने’ विषयावर पॅनल चर्चा होणार आहे.
महोत्सवात दाखविण्यात येणारे चित्रपट
महोत्सवात प्रदर्शित चित्रपटांमध्ये मिशन मंगल, एव्हरेस्ट, पॅसिफ्ढिक रिम उठाव, व्हायरस, टर्मिनेटर डार्क फ्Ÿढट, जिओस्टॉर्म, अमोरी, ब्लेड रनर आणि वॉल-ई यांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट विज्ञान आणि शास्त्रज्ञ या विषयांवर आधारित आहेत.









