नवी दिल्ली
होंडा कंपनीने भारतीय बाजारात आपली नवीन आवृत्तीवर आधारीत ऍक्टिवा 6-जी बाजारात दाखल केली आहे. याला स्टॅण्डर्ड आणि डिलक्स मॉडेलसोबत सादर केली आहे. गाडीची एक्सशोरुम किंमत 63,912 रुपये आणि डीलक्सची एक्स शोरुम किंमत 65,412 रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरची दुचाकी ही नवीन 6 प्रणालीवर आधारीतच बाजारात दाखल केली असून याच्या अगोदर ऍक्टिवा 125 चे इंजिनसोबत सादर केली होती. चालू महिन्याच्या शेवटी किंवा पेबुवारीच्या सुरुवातीला ही गाडी विक्रेत्याकडे उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.








