ऑनलाइन टीम / मुंबई :
भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना महाआघाडीवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. त्याच्या टीकेला राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
ते म्हणाले, शरद पवार हेच जाणते राजे आहेत. शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात हे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या 60 वर्षांच्या महाराष्ट्राचा सर्वांगिण विकासात सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. म्हणूनच ते जाणते राजे आहेत.
ते म्हणाले, होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजेच शरद पवार. तसेच जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसेच अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाईनमध्ये आलेले आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
तसेच कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱयातून मागवायची का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.