सांगली/प्रतिनिधी
कृष्णाघाट, मिरज येथील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची शाळा क्रमांक २० लोकसहभागातून डिजिटल झाली आहे. लोकसहभागातून मिळालेल्या चार संगणकासह (कम्प्यूटर लॅब) अद्ययावत संगणक कक्ष तयार करण्यात आला आहे. यासाठी पुण्यातील एका आयटी कंपनी कडून दोन संगणक व रोटरी क्लब मिरजकडून एक आणि डॉ.म्हेत्रे यांचेकडून एक अशा एकूण चार संगणकाची अद्ययावत कप्यूटर लँब (संगणक कक्ष) बनवण्यात आली आहे.
शाळेचे माजी विद्यार्थी दयानंद चव्हाण यांच्याकडून दोन मजबूत सुसज्ज असे टेबल व चार संगणक खुर्च्या अशी मदत शाळेला मिळाली, तसेच महापालिकेकडून एक व पुण्याच्या आय टी कंपनी कडून एक अशा दोन ४० इंची स्मार्ट टी व्ही मिळाल्या आहेत. यामुळे अभ्यासक्रमातील सराव विद्यार्थी संगणकावर हताळत आहेत. टी व्ही संगणकावर यु ट्यूबच्या माध्यमातून अभ्यासक्रमातील अवांतर माहिती स्वतःहून शिक्षकांच्या मदतीने मिळवित आहेत. विद्यार्थी स्मार्ट धडे गिरवित आहेत.ई लर्निंगयुक्त शिक्षण घेत आहेत.
शाळा डिजिटल करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती व संस्थेचे मुख्याध्यापक सुधाकर हजारे, सहा.शिक्षक महादेव हेगडे, शुभांगी लोंढे यांनी आभार मानले.








