प्रतिनिधी / बेळगाव :
रसिक रंजनतर्फे ‘सफर है ये गितोंका’ या फिल्मफेअरने सन्मानित जुन्या गाण्यांचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात झाला. हा कार्यक्रम कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात पार पडला.
यावेळी डॉ. एम. एम. नडकट्टी यांनी संकलित केलेली 1954 ते 70 च्या काळातील 25 हून अधिक बहारदार गाणी प्रदर्शित करण्यात आली. सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले.
प्रारंभी 1954 मधील बैजू बावरा या हिंदी चित्रपटातील ‘तू गंगा की मौज’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘जाये तो जाये कहाँ, ये रात भिगी भिगी, मांग के साथ तुम्हारी, आजारे परदेशी, सब कुछ सिखा, चौधवी का चाँद हो, हुसनवाले तेरा, चष्मेबद्दूर, ये गुलबदन, कही दीप जले कही दिल, जो वादा किया वो, चाहुंगा मै तुझे, बहारो फुल बरसाओ, सावन का महिना, निले गगन पे, मेरे देश की धर्ती, परदे मे रहने दो, आप मुझे अच्छे, रुप तेरा मस्ताना, आदीसह 25 हून अधिक गाणी यावेळी दाखविण्यात आली. एकापेक्षा एक सरस अशा बहारदार गाण्यांनी उपस्थित रसिकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
यावेळी सुधीर जोगळेकर, सी. डी. पाटील, सचिन पवार, नितीन कपिलेश्वरी आदीसह रसिक उपस्थित होते.









