प्रतिनिधी / बांदा:
पाडलोस-केणीवाडा येथील आंब्याचा गाळू येथील शेतात पाण्याच्या ठिकाणी वाघाच्या पावलांच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे वस्तीजवळील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केणीवाडा येथील शेतकरी अमित नाईक गुरांना चरण्यासाठी गुरुवारी सकाळी आंब्याचा गाळू येथील शेतात घेऊन गेले होते. त्यावेळी पाण्याच्या ठिकाणी बांधावर दोन-दोन फूट अंतरावर वन्यप्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसले. त्यांनी याची माहिती स्थानिकांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी पाहिले असता तो वाघच असल्याचा अंदाज वर्तविला.









