प्रतिनिधी/ सातारा
माझ्याकडे जी जी खाती आहेत. त्या खात्याच्या मार्फत सातारा जिह्याला भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेच. परंतु जे सातारकरांच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न आहेत तेही सोडविण्यासाठी माझा पाठपुरावा राहणार आहे, असे सांगत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिह्यात पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेना स्ट्राँग आहे. पहिल्याच दिवशी सेनेच्या जिह्यातील सेनेच्या पदाधिकाऱयांची बैठक घेतली आहे. पक्ष प्रमुख जे जे पक्ष वाढीसाठी आदेश देतील ते ते पाळून पक्ष संघटन मजबूत केले जाईल, असे स्पष्ट करत शरद पवारसाहेबांची मी आशिर्वाद घेतले. त्यांनी मला कौशल्य विकासवर जोर देण्यास सांगितले आहे. त्यांच्या सुचनेनुसार कौशल्य विकाससाठीच प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, वित्त मंत्री या नात्याने मी नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन आराखडा पूर्ण झाला आहे. मुदतीत कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी जिल्हा नियोजन समितीत काम करताना अनेक मुद्दे मांडलेले आहेत. काम प्राधान्याने झाले पाहिजे असा आग्रह असायचा. मार्च एण्डपर्यंत पैसे खर्च झाले पाहिजेत अशा सूचना दिल्या आहेत. दोन ते तीन विभाग अपव<ाद वगळता सर्व विभागाने खर्च निधी केला आहे. 100 टक्के रक्कम कशी खर्च करता यावी याकरता दि. 27 रोजी बैठक वित्तमंत्र्यांनी लावली आहे. तसेच दि. 20, 21 लाही पुण्याला बैठक लावली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीची अवस्था पाहता त्याच अनुषंगाने 2020-21 चा नियोजन आराखडा स्वतंत्रपणे तयार करण्याच्या सुचना केल्या आहेत. माझ्या जिह्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी मी आग्रही राहीन. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचाही आढावा घेतला आहे. तसेच काल मी पवारसाहेबांचे आर्शिवाद घेतले. त्यांनी विचारणा करताना कौशल्य विकासवर अधिक चर्चा माझ्याशी केली. कौशल्य विकासमध्ये ज्या जुने कोर्सेस ओहत. त्याऐवजी नवीन कोर्सेंसचा समावेश करावा, असे सांगितले आहे. त्याची पुरेपूर अंमलबजावणी केली जाईल. 3 कोटी अखर्चीत निधी सातारा जिह्यात राहिला आहे. तो खर्च करण्याबाबत ज्या अडचणी आहेत. त्या दुर करण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले आहे. शिवसेना वाढीसाठी काय प्रयत्न करणार या प्रश्नावर ते म्हणाले, पाटण तालुक्यात सेना स्ट्राँग आहे. सेना वाढीसाठी उद्धवसाहेब जो आदेश देतील त्याचे तंतोतंत पालन केले जाईल. राज्यमंत्री म्हणून सर्वच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
पाटणकरांच्या अजून शुभेच्छा नाहीत
भाजपा टीका करते आहे, असा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, विरोधकांचे काम टीका करण्याचेच असते. सत्ता नसल्यामुळे ते बैचेन आहेत. ते पुढच्या पाच वर्षातच काय दहा वर्षात येत नाहीत, अशी टीप्पणी केली. पुढे पाटणकर यांनी शुभेच्छा दिल्या काय? या प्रश्नांवर त्यांनी नाही हेच उत्तर दिले. तर शिवतारे यांच्या काळात कामे झाली नाहीत या प्रश्नांवर ते म्हणाले, त्यांच्या कार्यकाळात कामे झाली आहेत. ते जिह्यातले नव्हते हे मान्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
तामकणेचा प्रश्न सोडविणार
तामकणेच्या रखडलेल्या योजनेबाबत छेडले असता ते म्हणाले, मागच्या पालकमंत्र्यांनी पाहणी केली होती. त्यांनी सुचना दिल्या होत्या. निवडणुकीच्या कार्यकाळात ते काम मागे पडलेले आहे. आता ते काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच वाटोळेचीही योजना मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
महिलेची समस्या सोडविण्यासाठी दिल्या सूचना
मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी साताऱयातील मीना कांबळे नामक महिलेने प्रियदर्शनी मागासवर्गीय सोसायटीबाबत तक्रार केली असता मंत्री देसाई यांनी तत्काळ दखल घेवून लगेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना सूचना दिल्या. मात्र, त्यांचा घेतलेल्या तत्काळ दखलेमुळे त्या महिलेच्या चेहऱयावर आनंद दिसत होता.









