वृत्तसंस्था/नवी दिल्ली
प्रियांका गांधी नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधातील आंदोलकांचे समर्थन करतात. मात्र, त्यांना आपल्याच पक्षाची सत्ता असणाऱया राजस्थानमधील रूग्णालयात मृत्यू पावलेल्या बालकांविषयी कोणतीही सहानुभूती वाटत नाही. यातून त्यांचा पक्षपातीपणा दिसून येतो. राजस्थानातील कोटा येथे सरकारी रूग्णालयातील हलगर्जीपणामुळे अनेक बालके मृत्युमुखी पडली आहेत. पण काँग्रेसच्या कोणत्याही बडय़ा नेत्याने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले नाही. मात्र, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हिंसाचार करणाऱयांना मात्र त्यांचे समर्थन मिळते. काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचाच हा पुरावा आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.









