ऑनलाइन टीम / पुणे :
‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(‘आयएमईडी’) आयोजित स्पोर्ट्स मीट 2020′ या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार,१० जानेवारी रोजी सकाळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
तीन दिवसाच्या या क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल,हॉलीबॉल स्पर्धा होत असून 25 संघ सहभागी झाले आहेत.उदघाटन प्रसंगी बाळासाहेब लांडगे,महेश दूस,संतोष घाडगे हे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच ‘आयएमईडी‘ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर ,प्रदीप थोपटे,डॉ नेताजी जाधव,डॉ अजित मोरे उपस्थित होते. हा क्रीडा महोत्सव भारती विद्यापीठ पौड रस्ता कॅम्पस येथील मैदानावर सुरु आहे.









