ऑनलाइन टीम / जळगाव :
भाजपतील अतंर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. भुसावळ अध्यक्ष पदासाठी जळगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजनही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.
भाजपाच्या भुसावळ अध्यक्षपदासाठी जळगावमध्ये शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. याबैठकीला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व गिरीश महाजन हे उपस्थित होते.
दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना अचानक पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद एवढा वाढला की, घोषणाबाजी करत एकमेकांवर कार्यर्त्यांनी एकमेकांवर शाई फेकली. व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यावेळी रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन व्यासपीठावरच होते. वाद वाढल्यानंतर रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.









