प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शुक्रवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आला. शेफाली राजू पवार (वय १९, रा. शिरोली पुलाची) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने महाविद्यालयाच्या इमारतीतच ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अदयाप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.