ऑनलाइन टीम / मुंबई :
दीपिका पदुकोणच्या छपाक चित्रपटासमोर अजून एक नवी समस्या उभी राहीली आहे. हा चित्रपट उद्या 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. पण प्रदर्शनापूर्वीच या सिनेमावर अनेक संकटं आली आहेत.
ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने सिनेमात पेडिट न दिल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी कोर्टात केली आहे.
वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असं असतानाही निर्मात्यांनी सिनेमात त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख केलेला नाही तसेच कुठेच पेडिटदेखील देखील दिले नाही. याचविरुद्ध भट्टने दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, त्यांच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.









