ऑनलाइन टीम / नागपूर :
सत्तेतून बाहेर गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करावं असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.
फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जायला हवं, असं केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्ता गेल्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ताकद पणाला लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपला लक्ष्य केलं.
दरम्यान, जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.









