ऑनलाइन टीम / मुंबई :
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. शिवसेनेला काश्मिर मध्ये पुन्हा 370 कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
शिवसेना नेता संजय राऊत यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील भारत विरोधी ‘काश्मिर को चाहिये आझादी’ निदर्शनाचे समर्थन केले आहे. शिवसेनेला काश्मिर मध्ये पुन्हा 370 कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार!!?’ असा सवाल सोमय्या यांनी शिवसेनेला ट्विटद्वारे केला आहे.
दरम्यान, जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली होती.









