मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून घोषणा
प्रतिनिधी / रत्नागिरी
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना जाहीर झाला आहे. तर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘तरुण भारत’ रत्नागिरी आवृत्तीच्या प्रतिनिधी जान्हवी पाटील यांच्यासह तिघांना जाहीर झाला आहे. लवकरच मुंबईत होणाऱया एका विशेष समारंभात पुरस्कार वितरीत करण्यात येतील अशी माहिती मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी दिली. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
आद्य पत्रकार बाळशास्त्राr जांभेकर यांची जन्मदिवस व मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचा प्रारंभ दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या पत्रकारदिनी 2020 च्या पत्रकारीता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रायकर यांनी इंग्रजी आणि मराठी राजकीय पत्रकारितेमध्ये केलेल्या अर्धशतकी कारकीर्दीबद्दल त्यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणाऱया तीन राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांसाठी तरूण भारत रत्नागिरीच्या प्रतिनिधी जान्हवी पाटील. एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी आणि लोकसत्ताचे मुंबईतील पत्रकार संजय बापट यांची निवड करण्यात आल्याचेही सपाटे यांनी जाहीर केले आहे. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो, मधु कांबळे, चंदन शिरवाळे आणि खंडुराज गायकवाड यांची निवड समिती नियुक्त करण्यात आली होती.
अनेक विषयांवर विविधांगी लिखाण करणाऱया जान्हवी पाटील यांना यापुर्वी राज्य शासनाचा कोकण विभागाचा शि. म. परांजपे, राज्य स्तरीय बाळशास्त्राr जांभेकर पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी यापुर्वी गौरवण्यात आले आहे. आता मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारच्या रूपाने त्यांच्या पत्रकारितेचा गौरव होत आहे.









