वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
2020 च्या टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील ब्रिस्बेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत इलिना स्विटोलिना, जर्मनीची केर्बर तसेच ब्रिटनची कोंटा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
अमेरिकेच्या डॅनेली कॉलीन्सने पहिल्या फेरीतील सामन्यात चौथ्या मानांकित आणि माजी विजेत्या स्विटोलिनाचा 6-1, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये तासभराच्या कालावधीत पराभव करत विजयी सलामी दिली. अमेरिकेच्या सोफिया केलिन आणि रिसेकी यांनीही दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. केनिन लॅटव्हियाच्या सेव्हास्टोव्हाचा 7-6 (7-1), 6-4, अमेरिकेच्या रिसेकीने झेकच्या मुचोव्हाचा 6-4, 6-2 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या स्टोसूरने जर्मनीच्या केर्बरचा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडत पुढील फेरी गाठली. अन्य एका सामन्यात झैकच्या स्ट्रायकोव्हाने ब्रिटनच्या कोंटाचा 6-2, 3-6, 6-3, ऑस्ट्रेलियाच्या टॉमलेजोनोव्हिकने आपल्याच देशाच्या हॉनचा 6-2, 4-6, 6-4 असा पराभव केला.









