प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ाला तीन मंत्रीपदे मिळाल्याने निश्चित विकासाच्या वाटा खऱया अर्थाने खुल्या होणार आहेत. जिल्हय़ातील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य दिले जाईल, आमच्या दृष्टीने शेतकऱयांच प्रश्न महत्वाचे आहेत. त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी मंत्री पद पणास लावू, शेतकऱयांची कुणी चिंता करु नये, असा विश्वास नूतन मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी व्यक्त केला. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी दसरा चौक येथील ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी तरुण भारत परिवारासी त्यांनी संवाद साधाला.
निवासी संपादक मनोज साळुंखे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, जाहीरात विभाग प्रमुख (ग्रामीण) आनंद साजणे यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील यांनी ‘तरुण भारत’चे संस्थापक संपादक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापूर आणि त्यानंतर उदभवलेल्या गंभीर स्थितीमुळे जिल्हय़ातील शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी मोडून पडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱयांना आधार देण्याची नैतिक जबाबदारी आमच्यावर आली आहे. पण शेतकऱयांनी चिंता करु नये त्यांच्या विचाराचे हक्काचे सरकार राज्यात आले आहे. शेतकऱयांनी चिंता करु नये, ‘तरुण भारत’च्या माध्यमातून आवाहन करतो असेही ते म्हणाले.
कर्जमाफीत सुटसुटीतपणा कसा येईल याचा गांभिर्याने विचार सुरु आहे. प्रामाणिक शेतऱयालाही कर्जमाफी मिळाली पाहिजे ती कशा पद्धतीने देता येईल यावर सरकार गंभीर आहे. तसे न झाल्यास शेतकरी कर्जच भरणार नाहीत, हा धोका जिल्हा बॅकांना अडचणीत आणारा आहे. त्यामुळे थोडा उशिर झाला तरी चालेल शेतकऱयांनी संयम ठेवून कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. माजी खासदार राजू शेट्टी यांनाही याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री सतेज पाटील यांनी शहराती प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणार असल्याचे संगितले, ते म्हणाले, शाहू समाधीस्थळ, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, टोल आंदोलनातील गुन्हे मागे घेणे, थेट पाईपलाईन हे विषय येत्या वर्षभरात मार्गी लावण्याचा मनोदय असल्याचे सांगितले.
जमेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी
सार्वत्रीक आणी सहकारी संस्थांमधील राजकारणाला स्थानिक कंगोर असतात त्यामुळे सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी होईल हे आज सांगता येत नाही. मात्र जमेल त्या ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न राहिल गोकुळमध्येही आघाडीचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पी. एन.’ नेते आणि मार्गदर्शनकही
आमदार पी. एन. पाटीला गोकुळमध्ये सोबत येणार काय या प्रश्नावर ते आमचे मार्गदर्शक आहेत. असे मुश्रीफ मिस्कीलपणे म्हणाले, तर मंत्री सतेज पाटील यांनी ते तर आमचे नेतेच आहेत. असे हसत हसत म्हणाले, त्यामुळे गोकुळची निवडणूक पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची तयारी असल्याचेच अप्रत्यक्षरीत्या सांगत गोकुळमधील संभाव्य घडामोडीचे संकेत दिले.