कणकवली:
करुळ – कदमवाडी येथील सौ. साक्षी सचिन कदम (29) या चार वर्षीय मुलीसमवेत राहत्या घरातून 24 डिसेंबरला सकाळी 11 वा. पासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची खबर त्यांचे पती सचिन लवू कदम (30, करुळ – कदमवाडी) यांनी पोलिसांत दिली.
खबर दिल्यानुसार, साक्षी या गृहिणी असून सचिन मोलमजुरी करतात. 24 रोजी सकाळच्या सुमारास सचिन हे कामावर गेले होते. याचदरम्यान साक्षी या ‘कणकवलीला जाऊन येते’ असे सासूला सांगून मुलीसमवेत घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्या अद्यापही घरी परतलेल्या नाहीत. तसेच यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्येही त्या अशाच बेपत्ता झाल्या होत्या. साक्षी यांची ऊंची साडेचार फूट, केस काळे व मध्यम, चेहरा उभट, डाव्या डोळय़ाच्या बाजूस जुनी जखमेची खूण, अंगात भगवी साडी व भगवे ब्लाऊज, गळय़ात मंगळसूत्र आहे. मुलीची ऊंची अडीच फूट, रंग सावळा, चेहरा गोल, अंगात निळा फ्रॉक, कानात मुदी आहे. अशा वर्णनाची विवाहिता व बालिका आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार तथा फोंडाघाट दूरक्षेत्राचे हवालदार दयानंद चव्हाण यांनी केले आहे.









