ऑनलाइन टीम / मुंबई :
केरळमध्ये राहणाऱया करमाला मोडेक्स या महिलेने गायिका अनुराध पौडवाल यांची कन्या असल्याचा दावा केला होता. यावर अनुराधा पौडवाल यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
त्या म्हणाल्या, मोडेक्सनं केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसून ते निरर्थक आहेत. तसेच या प्रकरणामुळं माझी प्रतिमा मलीन झाली आहे. असंही त्या म्हणल्या.
दरम्यान, आपण अनुराध पौडवालची मुलगी आहोत हे सिद्ध करण्यासाठी महिलेनं कोर्टात याचिका दाखल केली असून मालमत्तेत हिस्सा आणि 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.









