ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनमधील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर’ जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहे.
‘ओरा आर-1’ असे या कारचे नाव आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱया ऑटो एक्सपोमध्ये ‘ग्रेट वॉल मोटर’ पहिल्यांदाच ही कार दाखवणार आहे. सध्या बाजारात असलेल्या इतर इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत ही कार खूपच स्वस्त असणार आहे. सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या किंमती साधारणपणे 20 लाखांच्या घरात आहेत. मात्र, या कारची किंमत 6.2 ते 8 लाख असणार आहे.
‘ओरा आर-1’ ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 351 किलोमीटर धावणार आहे. या कारमध्ये 35 केडब्ल्यूची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. किंमत कमी असल्याने भारतीय बाजारात ही कार मोठी स्पर्धा करेल, असे सांगण्यात येत आहे.