वृत्तसंस्था नवी दिल्ली :
देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील विविध घडामोडींमध्ये पुन्हा तेजी राहिली आहे. नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे उत्पादनात झालेली वाढ यामुळे डिसेंबरमध्ये पीएमआय मागील सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आयएचएस मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंगचा पर्चेजिंग मॅनेजर्स निर्देशांक (पीएमआय) डिसेंबर महिन्यात 52.7 टक्क्यांवर राहिला आहे. पीएमआयने मे महिन्यानंतर हा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबरमध्ये पीएमआय 51.2 अंकाच्या दोन वर्षांचा निचांकावर राहिला होता. निर्देशांक 50 च्य वरती पोहोचल्यामुळे उत्पादन विस्तार सूचक आहे. जीएसटी कलेक्शन , मुख्य क्षेत्रातील इंडस्ट्रीज, वाहन विक्री आणि नॉन-आईल मर्केडाइज एक्स्पोर्टच्या आकडेवारीमुळे निर्मिती क्षेत्रातील घडामोडींमध्ये सुधारणा पहावयास मिळाली आहे.