प्रतिनिधी/ निपाणी :
मराठी भाषा ही वैश्विक आहे. लवकरच तिला अभिजात भाषेचा दर्जादेखील प्राप्त होणार आहे. मराठी भाषेत प्राविण्य मिळविलेली व्यक्ती कुठेच कमी पडत नाही, असे विचार प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले.
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाचे उद्घाटन प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर होते. डॉ. माने म्हणाले, आपल्या खंडप्राय देशात सर्वच प्रादेशिक भाषांना महत्त्व आहे. प्रत्येकाने भाषा बांधव्य जपलेच पाहिजे. पण अभिव्यक्तीसाठी आपली मातृभाषाच उपयुक्त ठरते. प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर म्हणाले, मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच आहे. इंग्रजी अवश्य शिकावे पण त्यासाठी मातृभाषेचे महत्त्व कमी होता कामा नये, असे सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. रमेश साळुंखे, प्रा. आशालता खोत, प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. प्रकाश पाटील, प्रा. विष्णू पाटील, प्रा. डॉ. सुजाता पाटील, प्रा. सुप्रिया काटकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रोहिणी पाटील, पाहुण्यांचा परिचय सुप्रिया कापसे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुषमा ठगरे यांनी केले तर आकांक्षा सुतार यांनी आभार