प्रतिनिधी/ सातारा
शेतकरी केंद्र बिंदू मानून त्याच्या पर्यंत कृषी तंत्रज्ञानाची गंगा पोहोचविणेसाठी शेतकरी, बँक, शेती विषयक तज्ञ यांच्यात समन्वय साधणे, आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करुन शेतक-यांची कौशल्यक्षमता वाढविणे, शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच कृषि व कृषिपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे रहानीमान उंचावणे या उदात्त हेतूने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या संकल्पनेतून व आदरणीय संचालक मंडळाच्या मार्गदर्शनानुसार बँकेने जिल्हास्तरावर ‘यशवंत किसान विकास मंच’ स्थापन करणेत बँकेने पुढाकार घेतला आहे.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष मा. आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी गिरवी ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी श्री. रामदास कदम यांचेकडे अध्यक्ष व श्री. बलभीम भोसले यांचेकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, बँकेने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सुविधा व सेवा त्वरित उपलब्ध व्हाव्यांत याकरिता 304 शाखा व 15 विस्तारीत कक्षांचे जाळे कृषी-सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतीमान करणेसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा बँकेमार्फत यशवंत किसान विकास मंचाची स्थापना केली आहे.
याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबाना अभिप्रेत कृषी व सहकारी क्षेत्रातील कार्य बँक आज तळमळीने व निष्ठेने करीत असून विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत आहे. शेतीच्या मूलभूत सुविधा पुरविणे शेतीसाठी पाणी, उच्च प्रतिचे बि-बीयाणे व औजारे उपलब्ध करणे, तसेच वेगवेगळया कंपन्या, तंत्रज्ञान वापरणारा शेतकरी, शासकीय विभाग, अर्थ पुरवठा करणा-या बँकां यांच्यामध्ये समन्वय साधून शेतीमध्ये उत्पादन वाढवून घेणे व व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन शेती व शेतीपूरक व्यवसाय करणे. एकंदरीत आधुनिक शेतीचा वापर करून शेतकयांचे आर्थिक जीवनमान उंचावणेसाठी प्रयत्न करणे व त्यास प्रतिष्ठा मिळवून देणे हाच या विकास मंचाचा स्थापन करण्यामागे उद्देश आहे. यशवंत किसान विकास मंचाच्या माध्यमातून शेतकयांचा शेती उत्पादित माल परदेशात निर्यात करणेसाठी तसेच गरजेनुसार शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करणेसाठी प्रयत्न करणे व मार्गदर्शन करणे. जिल्हयातील यशस्वी प्रगतशील शेतकरी या मंचाचे सदस्य असून जिह्यातील इतर शेतकरी सभासदांना मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. जिह्यातील शेतकयांसाठी शेतीशी निगडीत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जिल्हयातील प्रगतशील शेतकयांनी त्यांचे स्वतःचे अनुभवातून अवगत केलेले शेतीतील प्रगत ,आधुनिक ज्ञान व सुधारीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविले जाणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी शेतकयांसाठी विविध मेळावे आयोजित करून प्रगतशील शेतकयांचे मार्फत शेतीविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. किसान विकास मंचाचे माध्यमातून प्रगतशील शेतकरी हे जिह्यातील इतर शेतकयांसाठी ‘कृषिविषयक दूत’ म्हणून कामकाज पाहणार आहेत.
सरव्यवस्थापक, श्री राजेंद्र भिलारे म्हणाले, भारत हा शेती प्रधान देश असून शेती केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून केलेचे दिसून येते .पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून आधुनिक पध्दतीने तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करणेचे उद्देशाने जिल्हा बँकेमध्ये हायटेक विभागाची स्थापना करणेत आली . यामध्ये जिल्हयातील शेतकरी सभासदांसाठी विविध प्रकारचा कर्ज पुरवठा सुरु करणेत आला असून शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात असले तरी शेती उत्पादनामध्ये अपेक्षित प्रमाणात वाढ झालेचे दिसून आले नाही . जिल्हयातील प्रगतशील शेतकयांनी स्वतःचे अनुभवातून अवगत केलेले शेतीतील प्रगत, आधुनिक ज्ञान व सुधारीत तंत्रज्ञान शेतकयांपर्यंत बँकेच्या व कृषि विभागाच्या माध्यमातून व समन्वयातून प्रसारीत केल्यास शेती विकासाला चालना मिळेल. यासाठी बँकेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर जिल्हयातील प्रगतशील शेतकरी यांचा एक किसान मंच स्थापन करुन किसान मंचाच्या माध्यमातून प्रगतशील शेतक.यांच्या शेती व शेतीपूरक ज्ञानाचा तसेच कृषी विभागातील व जिल्हा बँकेतील योजनांचा प्रसार केल्यास शेतकयांच्या उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ होईल .









