प्रतिनिधी/ फलटण
फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी विद्यमान उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांची तर उपसभापतीपदी रेखा खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली
फलटण पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने आज सभापती पदाची निवड घेण्यात आली पंचायत समिती सभागृहात पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सभापतीपदासाठी शिवरूपराजे खर्डेकर आणि उपसभापती पदासाठी रेखा खरात यांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले
फलटण पंचायत समितीवर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून 14 पैकी 12 सदस्य त्यांचे तर विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत शिवरूपराजे खर्डेकर हे मागील तीन वर्षापासून पंचायत समितीचे उपसभापती म्हणुन कार्यरत होते तसेच जिल्हा बँकेचे संचालक आहेत ते आसू गणातून तर रेखा खरात पाडेगाव गणातून निवडून आले आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत सभापती पदाची संधी दिली या निवडीबद्दल नूतन सभापती उपसभापती यांचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, गट विकास अधिकारी अमिता गावडे यांनी अभिनंदन केले आहे
ङङचौकटङङ
पंचायत समिती सभापती निवडीसाठी आज निर्धारित वेळेत सर्व पत्रकारांना गटविकास अधिकारी यांनी बोलविले होते काही पत्रकार सभागृहात गेले असता पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी काहीही कारण नसताना पत्रकारांना बाहेर जाण्याचे फर्मान शिपाईतर्फे काढले यावर काही सदस्यांनी पत्रकारांना बाहेर न जाण्याची विनंती केली निवडी पार पडल्यावर सनकी स्वभावाच्या प्रांताधिकारी यांचा पत्रकारांनी निषेध केला वारंवार पत्रकाराना अपमानस्पद वागणूक देण्याचा प्रयत्न ते करीत असल्याने पत्रकारांनी एकजुटीने त्यांच्या विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे
तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा अवैध धंदे चालू असून त्याकडे दुर्लक्ष करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाया पत्रकारांना डावलण्याचा आणि त्यांना अपमानस्पद वागणूक देण्याचा प्रयत्न प्रांताधिकारी यांच्याकडून सुरू असल्याने पत्रकाराना ’ताप’ देणायाचा ’जग’जाहीर भांडापोड करण्याचा ’पण’ पत्रकारांनी केला आहे









