कोल्हापुरात बिबट्याचा थरार, नागरिकांमध्ये भीती
कोल्हापूर : मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा होती मात्र वनविभागाकडून शोध मोहीम सुरू होती वनविभागाला बिबट्या चकवा देत होता आज दुपारी विवेकानंद महाविद्यालयासमोर घरकाम करताना महिलांना बिबट्याचा दर्शन झालं यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले यानंतर वन विभागाकडून ही बिबट्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र झाडावर लपून बसलेल्या बिबट्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कृष्णात पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला ते जमिनीवर पडले, हातात असलेल्या काठीने ती प्रतिकार करत होते मात्र बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जमिनीवर पाडलं, यांनतर बिबट्या नागरी वस्तीत शिरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते
कोल्हापूर पोलीस दल आणि वनविभागाच्या वतीने बिबट्याला शोधण्याचे काम सुरू होते, काही काळानंतर बिबट्या हा गटारीमध्ये गेल्याचे आढळल्यास कोल्हापूर पोलीस दल आणि वनविभागाने सापळा रचत त्या बिबट्याला अखेर पकडले यांनतर त्या बिबट्याला वनविभाग गाडीत घालून नेण्यात आले आहे , काल पासून बिबट्या परिसरात वावरत होता त्यामुळे नागरिकांच्या मनातं धास्ती बसली होती पण आज बिबट्या सापडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे..








