लाल किल्ल्याबाहेरील स्फोटानंतर कोल्हापुरात अलर्ट
कोल्हापूर : दिल्ली येथील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटानंतर शहरासह जिल्ह्यातील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. शहराच्या प्रमुख ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर गस्तीमध्ये बाढ करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी दिल्ली येथील लाल किल्ल्याबाहेर वाहनांमध्ये स्फोट झाले. त्यामुळे देशात अलर्ट लागू केला आहे. जिल्ह्यासह शहरातही अलर्ट लागू केला आहे. शहराच्या प्रमुख ठिकाणांवर बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. अंबाबाई मंदिर, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सर्किट बेंच यासह महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सोमवारी रात्री सर्व पोलीस ठाण्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.








