वार्ताहर/उचगाव
येथील उचगाव प्रीमियर लिग आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेला उचगाव वैकुंठधाम येथे प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बाळकृष्ण तेरसे, भगवा ध्वज स्तंभाचे पूजन शशिकांत जाधव यांच्या हस्ते, करण्यात आले तर विनोद पावशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविले. तर यष्टीचे पूजन जीवन कदम तसेच जावेद जमादार, नेहाल जाधव, बसवंत चौगुले, सुरेश चौगुले, गजानन बांदिवडेकर, पवन देसाई, यांच्या हस्ते क्रिकेट मैदानाचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.









