लेन्सकार्ट, फिजिक्सवाला, ग्रो यांचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहता लेन्स कार्ट, फिजिक्सवाला आणि ग्रो या कंपन्यांचे समाग शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. याशिवाय इतरही आयपीओ खुले होणार आहेत. ग्रे मार्केटमधील ट्रेंडनुसार पाहता या कंपन्यांचे लिस्टिंग 4 ते 22 टक्के प्रिमीयम असू शकेल असे मानले जात आहे. बाजारातील गुंतवणूकदारांचा कल आणि बाजाराची एकंदर स्थिती पाहता त्यानुसार हा अंदाज वर्तवला जात आहे.
टेक्नोक्लीन एअर
ऑटोमोटीव्ह सिस्टम सप्लाय करणारी कंपनी टेक्नोक्लीन एअर यांचा आयपीओ या आठवड्यामध्ये खुला होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये प्रीमियमवर 87 रुपये वरती हा समभाग असून इशु प्राईस 397 रुपयांच्या वर जवळपास 22 टक्के प्रीमियम वर समभाग उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फिजिक्सवाला
फिजिक्सवाला यांचा आयपीओ 11 नोव्हेंबर रोजी खुला होणार असून 18 नोव्हेंबरला बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. 3480 कोटी रुपये कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभारणार आहे. ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म चालवणारी ही कंपनी आहे. इशू प्राईस 109 रुपयाच्या तुलनेमध्ये जवळपास 8 टक्क्यांच्या प्रीमियमसह समभाग सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
एम व्ही फोटोवॉल्टीक
एम व्ही फोटोवॉल्टीक यांचा आयपीओ बाजारात येणार असून कंपनी 2900 कोटी रुपये उभारण्याची तयारी करते आहे. सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये पॅनल निर्मितीच्या कार्यामध्ये ही कंपनी आघाडीवर राहिलेली आहे. सदरच्या आयपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे कामकाजी भांडवलासाठी करणार आहे.
ग्रो
ग्रो यांचा आयपीओ नुकताच बंद झाला असून तिला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 6632 कोटी रुपयांची उभारणी कंपनी करणार असून आयपीओ बंद झाला असून 17.6 पट सबक्रिप्शन मिळाले आहे. इशू प्राइस 100 रुपयाच्या तुलनेमध्ये समभाग 5 टक्क्यांच्या प्रिमीयमसह बाजारामध्ये खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे चष्म्याच्या क्षेत्रात कार्यरत असणारी लेन्स कार्ट ही कंपनी 7278 कोटी रुपयांचा आयपीओ आणत असून या आयपीओला 28 पट सबक्रिप्शन मिळाले आहे.









