साताऱ्यातील साहित्यिक इतिहासात 99 वे संमेलन खास ठरणार
सातारा : येथील राजधानीत भाऊसाहेब स्वागताध्यक्ष असताना 66 वे मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते. तदनंतर 33 वर्षांनंतर 99 वे मी स्वागताध्यक्ष असताना होणार असल्याने मोठा योगायोग आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री ना.छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूर्व ग्रंथ महोत्सव येथील जिल्हा परिषदे च्या मैदानावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरीत चार दिवसीय संपन्न झाले.तेव्हा ना.छ. शिवेंद्रराजे भोसले मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे होते.
ना.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “राजधानीत ९९ वे होणारे संमेलन हे हटके स्वरूपात झाले पाहिजे.जेणे करून पुढील 10 वर्षे राज्यभर चर्चा राहील. त्यासाठी सर्वांनी आपापला खारीचा वाटा देऊन योगदान दिले पाहिजे.” कविवर्य प्रदीप कांबळे म्हणाले, “भाऊसाहेबांना प्राचार्य संभाजी पाटणे यांनी स्वागताध्यक्षांचे मनोगत दिले होते.आता प्राचार्य यशवंत पाटणे ना.शिवेंद्रराजे भोसले यांना मनोगत लिहून देणार आहेत.हाही दुर्मिळच योगायोग म्हणावा लागेल.”
यावेळी अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे व कार्याध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी ऐतिहासिक दाखला देत अभ्यासपूर्ण अशी माहिती कथन केली.प्रथमतः पुस्तक स्टॉलवर ना.भोसले यांनी भेटी देऊन माहिती घेतली.
सदरच्या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,सुनीताराजे पवार, काका पाटील,राजेंद्र पवार,अभय नलगे,विठ्ठल कुडाळकर,सुनीता कदम,डॉ. भावार्थ देखणे,पूजा देखणे,राजन लाखे,श्रीकांत तारे,उदय भोसले आदी मान्यवरांसह,ग्रंथ महोत्सव समितीचे पदाधिकारी,सदस्य, पत्रकार व श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.








