रामनगर
जोयडा तालुक्यातील रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास पदवीपूर्व महाविद्यालयाचा जलतरणपटू ओम जुवळीने नुकत्याच झालेल्या धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालय धारवाड अंतर्गत महाविद्यालय जलतरण स्पर्धेत 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक तर 100 मी. व 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदके तसेच 100 मी. फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक मिळविले. ओम जुवळीने यापूर्वी झी स्विमिंग अॅकॅडमी बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकविले होते.









