ऑस्ट्रेलिया/ वृत्तसंस्था
ब्रिस्बेन
परदेशात आणखी एका मालिकेत विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर भारत असून आज शनिवारी येथे भारत व आँस्ट्रेलिया हे दोन्ही संघ पाचव्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने येतील तेव्हा भारत फलंदाजीतील सातत्याचा अभाव दूर करून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट अधिकाराने करण्याचा प्रयत्न करेल.
पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी अजिंक्य आघाडी भारताने घेतलेली असून ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यांनी मागील 17 वर्षांत टी-20 मालिका गमावलेली नाही. हा पराक्रम त्यांनी कायम राखला आहे आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ या मालिकेचा शेवट जोरदार पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले जाईल. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघ आज शेवटच्या वेळी आमनेसामने येतील तेव्हा ऑस्ट्रेलिया भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या आव्हानाचा सामना करण्याचा प्रयत्न करेल.
भारताने मागील सामन्यात रणनीतीच्या दृष्टीने चांगली जाणीव दाखवली आणि अवघड खेळपट्टीवर जुळवून घेतले. गिलने चांगली सुरुवात करण्यास हातभार लावून 14 षटकांत 2 बाद 121 पर्यंत मजल मारण्यात आली होती. परंतु नंतर संघाचे चार फलंदाज 15 धावांतच बाद झाले. उपकर्णधार गिलने मागील सात डावांमध्ये अर्धशतक केलेले नाही. असे असले, तरी चौथ्या टी-20 मध्ये त्याने 46 धावा केल्या. हे त्याचा फॉर्म पुन्हा येत असल्याचे लक्षण आहे. गिलने अलीकडच्या काळात त्याची नेहमीची लय दाखवलेली नाही. गेल्या सामन्यात तो शांत दिसला, पण एका संथ चेंडूने त्याला बाद केले. हा सलामीवीर संघ व्यवस्थापनाच्या चिंता कमी करण्यासाठी आणि चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल.
सूर्यकुमारने मालिकेत चमक दाखवली आहे, परंतु त्याला त्याच्या चांगल्या सुऊवातीचे रूपांतर करण्यात संघर्ष करावा लागला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या सामन्यांपूर्वी कर्णधाराकडून अधिक मोकळेपणाने फलंदाजी करण्याची आणि कर्णधारास साजेशी कामगिरी करण्याची अपेक्षा केली जाईल. तिलक वर्मा हा आणखी एक फलंदाज आहे, ज्याला अद्याप त्याची लय सापडलेली नाही. त्याने गेल्या तीन सामन्यांमध्ये 0, 29 आणि 5 धावा केल्या आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या ऐवजी खेळलेला यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मावरही दबाव असेल. अद्याप त्याला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
अभिषेक शर्माने मात्र जगातील अव्वल क्रमांकाचा टी-20 फलंदाज म्हणून आपली प्रतिष्ठा सार्थकी लावली आहे. त्याने दणदणीत अर्धशतक झळकावले आहे आणि वेगवान सुऊवात करून दिली आहे. भारताच्या खालच्या फळीनेही प्रभावी कामगिरी केली आहे. मागील सामन्यात अक्षर पटेलने 11 चेंडूंत 21 धावा केल्या. 7 व्या आणि 8 व्या क्रमांकावरील अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संघाला मौल्यवान लवचिकता आणि खोली मिळाली आहे.
गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंगने पुन्हा एकदा भारतासाठी आपली योग्यता सिद्ध केली आहे, त्याने चार बळी घेतले आहेत आणि जसप्रीत बुमराहसोबत नवीन चेंडू हाताळणारी प्रभावी जोडी तयार केली आहे. कुलदीप यादवच्या अनुपस्थितीतही वऊण, अक्षर आणि वॉशिंग्टन हे फिरकी त्रिकूट भारतासाठी एक मोठी ताकद आहे. शिवम दुबे आणि वॉशिंग्टन दोघेही फलंदाजी नि गोलंदाजी योगदान देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. दुबेच्या 23 चेंडूंत 49 धावांनी भारताला तिसरा टी-20 सामना जिंकून दिला, तर चौथ्या सामन्यात वॉशिंग्टनने 3 धावांत घेतलेल्या 3 बळींनही सामना फिरविला. दुबेनेही त्या सामन्यात 22 चेंडूंत 18 धावा काढल्या आणि दोन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा विचार करता चौथ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा दर्जेदार फिरकी गोलंदाजांविऊद्ध त्यांचा कमकुवतपणा उघडकीस आला. वऊण चक्रवर्ती, अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी कॅरारा ओव्हल येथे 10 पेक्षा कमी षटकांत सहा बळी घेतले. पाहुण्या संघाची फलंदाजी कर्णधार मिशेल मार्श, मार्कस स्टोइनिस आणि टिम डेव्हिडवर अवलंबून आहे. गेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या संधी कमी झाल्या आणि त्यांना 168 धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. सलामीवीर म्हणून यश मिल्वलेल्या अष्टपैलू मॅथ्यू शॉर्टने या मालिकेत खालच्या क्रमावर फलंदाजी केली. परंतु हेडच्या अनुपस्थितीत वरच्या क्रमांकावर प्रभाव पाडण्याची संधी त्याने गमावली. आज शनिवारी तो सुधारणा करण्यास उत्सुक असेल. जोश हेझलवूडची अनुपस्थिती देखील ऑस्ट्रेलिया जाणवली आहे. यजमान संघाच्या माऱ्यात भेदकतेचा अभाव आहे. नाथन एलिस आणि अॅडम झॅम्पा यांनी बरीच जबाबदारी घेऊन गोलंदाजी केलेली आहे, परंतु बेन द्वारशुईस चौथ्या टी-20 मध्ये एकही बळी घेऊ शकला नाही. यजमान संघ अंतिम सामन्यात महली बियर्डमनचे पदार्पण घडविण्याचा विचार करू शकतो.
संघ : भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीशकुमार रे•ाr, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वऊण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, जोश फिलिप, मिचेल ओवेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट कुहनेमन, अॅडम झॅम्पा, महली बियर्डमन, बेन द्वारशुईस, झेवियर बार्टलेट, नाथन एलिस, मार्कस स्टोइनिस.
सामन्याची वेळ : दुपारी 1:45 वा.









