वृत्तसंस्था / रियाध
डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या कोको गॉफला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
साबालेंकाने या सामन्यात गॉफचा 7-6 (7-5), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या पराभवामुळे गॉफचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. साबालेंकाच्या विजयामुळे पोलंडच्या जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. तिने बेलारुसच्या टॉपसिडेड पेगुलाने जस्मिन पाओलिनीचा 6-2, 6-3 अशा सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे.









