लखनौ :
समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांनी शुक्रवारी पुत्र अब्दुल्लासोबत पक्षप्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. अखिलेश यांच्यासोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे सांगण्यास आझम यांनी नकार दिला आहे. आझम खान हे समाजवादी पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत आझम खान यांचे मधूर संबंध नसल्याचे मानले जाते.









