वृत्तसंस्था/नवी दिल्ली
28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने या चषकाचा दौरा आयोजित केला आहे. हॉकी चषकाचा हा प्रवास भारतातील 20 शहरांतून होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी आता केवळ काही आठवडे बाकी राहीले आहेत. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारी हॉकी चषकाच्या दौरा कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. या समारंभाला केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री मनसुख मांडविया, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि क्रीडा युवजन खात्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तयाब इक्रम, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की, सचिव भोलानाथ सिंग उपस्थित राहणार आहेत.









