दोडामार्ग – प्रतिनिधी
ज्येष्ठ शिक्षक, संगीततज्ज्ञ, गायक, वादक, शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, संगीत नाट्यदिग्दर्शक प्रेमप्रकाश लक्ष्मण नाईक यांची मुलाखत गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमात गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. प्रसारित करण्यात येणार आहे. गोव्यातील मुलाखतकार राजू भिकारो नाईक यांनी ही मुलाखत घेतली असून गोवा दूरदर्शनचे निर्माते राजेंद्र नरसिंह फडते यांनी मुलाखतीची निर्मिती केली आहे.









