प्रतिनिधी/ बेंगळूर
2025-26 सालातील दहावी परीक्षा-1 आणि बारावी परीक्षा-1 व 2 चे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 18 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत दहावी परीक्षा-1 होणार आहे. तर 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 या कालावधीत बारावी परीक्षा-1 होणार आहे. त्याचप्रमाणे 25 एप्रिल ते 9 मे 2026 या कालावधीत बारावी परीक्षा-2 होईल. शिक्षण खात्याच्या http://www. kseab.karnataka.gov.inया वेबसाईटवर परीक्षेचे वेळात्रक उपलब्ध करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळा-महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर परीक्षेचे वेळापत्रक प्रदर्शित करण्याची सूचना मंडळाने दिली आहे.










