वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियातील कॉफ्स हार्बर येथे झालेल्या 6000 डॉलर्स बक्षीस रकमेच्या नॉर्थ कोस्ट ओपन स्क्वॅश चॅलेंजर स्पर्धेच्या महिलांच्या उपांत्य फेरीत भारताच्या रतिका सुथंथिरा सीलनला दुसऱ्या मानांकित लोजायन गोहारीकडून पराभव पत्करावा लागला.
तामिळनाडूच्या सातव्या मानांकित सीलनला चार गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. इजिप्शिन प्रतिस्पर्ध्याने तिच्यावर 12-10, 5-11, 11-3, 11-3 असा विजय मिळवला. रतिकाने शुक्रवारी क्वार्टरफायनलमध्ये तिसऱ्या मानांकित बोबो लामला पराभवाचा धक्का दिला होता.









