विठुनामाने अवधी दुमदुमली पंढरी नगरी
संतोष रणदिवे
पंढरपूर : काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल /इथे नांवतो केवळ पांडुरंग // संत एकनाथांनी वर्णन केल्याप्रमाणे पंढरपुरात केवळ आणि केवळ पांडुरंगच सदैव नांदतो. याच पांडुरंगाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी भूवैकुंठ नगरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाखांहून अधिक वैष्णवांमुळे अवघी पंढरी विठ्ठलमय झाली आहे.
आषाढी एकादशीस निद्रिस्त झालेले विठ्ठल भगवंत कार्तिकी एकादशीस उठतात आणि भक्तांची सेवा करतात. याचसाठी आषाढीनंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकीकडे पाहिले जाते. याकरिता पंढरपुरात सध्या पाचलाखांहून अधिक भाविकांची दाटी झालेली आहे. शनिवारी सायंकाळी पावसाने पंढरपुरात सुरुवात केल्याने काही काळ भाविकांची तारांबळ उडाली होती.
आज रविवारी पहाटे एकादशींच्या महापूजेनंतर सोहळ्याला सुरुवात होईल. दिवसभर हरिनामाचा गजर, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नानामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर मग्न असताना दिसून येणार आहेत. एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिराबर आकर्षक विद्युत रोषणाई मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. भाविकांची संख्या यंदा घटल्याने सायंकाळी सहापर्यंत पत्राशेड १० च्यापुढे मुखदर्शनाची रांग पोहचली आहे. त्यामुळे दर्शनासाठी जास्तीचा कालावधी लागत आहे.
तर मुखदर्शन अवघ्या काही तासांमध्ये होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी संपूर्ण दर्शनरगिमध्ये मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, स्वच्छता व वैद्यकीय सुविधा या पुरविल्या आहेत. या एकादशीच्या सोहळ्यासाठी एसटी प्रशासनाकडून सोडण्यात आलेल्या जादांच्या एसटी बसेस तसेच रेल्वेकडील विशेष रेल्वेगाडया यांच्यामधून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात उशिरापर्यंत दाखल झालेले आहेत. याशिवाय आज देखील दिवसभरामध्ये अधिक भाविक येण्याची शक्यता आहे.
याशिवाय अनेक भाविक हे खासगी वाहनाने देखील पंढरपुरात येऊन दाखल होत आहे. बारींच्या निमित्ताने सध्या पंढरपुरात होत असलेल्या गर्दनि संपूर्ण पंढरपूर हाऊसफुल्ल झाले आहे. यामध्ये चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱ्या ६५ एकर येथे भाविकांनी वास्तव्य केले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. मंदिर समितीच्यावतीने मंदिर गाभारा हा फुलांनी सजविला आहे तर मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.








